marathi motivational quotes 2020 | |मराठी प्रेरणादायी सुविचार सुविचार

marathi motivational quotes 2020

marathi motivational quotes 2020 :: First thanks to all of you to visit marathistetus.com  site  Hello Friend Today I am sharing a good collection for you about marathi Status  For. these days there is a good trend of marathi motivational quotes 2020 For whatssap and  Facebook. So  I have decided to write New marathi  status on the marathi language for you. So friends if you have found these marathi motivational quotes 2020  lines useful for you. Then share with your friends and also you can also check good marathi motivational quotes 2020 and  Share these marathi motivational quotes 2020  also on social media accounts and support our site and visit again.


marathi motivational quotes 2020

marathi motivational quotes 2020

*”आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा”*
*”योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही”.*


 


_*नशीबही आपल्यासमोर हरायला तयार असते, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे…*_


*??कधी कुणाच्या शोधात निघू नये कारण… लोक हरवत नाही, बदलून जातात….??*
?? ??
*!!..ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून ही पाणी येतं ती लोकं कमजोर नाही …तर सच्च्या मनाची असतात! #🙏

 

हे पण वाचा

  1. 100 { Best } royal attitude status in marathi
  2. 100 { Best } marathi attitude status for boy
  3. 100+ { Best } marathi attitude status facebook

* If you do what the world likes, you will be a “product” and if you do what you like, you will live as a “brand” *
_


💯
*श्रीकृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य -*

*जीवनात कधी संधी मिळाली तर …*
*”सारथी” बना, “स्वार्थी” नको*


🎭# *आयुष्य तर आपण जगतोच …..*
*पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर….*
*आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत जगण्यात असते…..!!*😘

 


motivational quotes in marathi for success

marathi motivational quotes 2020


पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुश्य म्हणतात .
▬▬▬▬▬ ▬▬▬▬▬


*आयुष्य फार लहान आहे..*
*जे आपल्याशी चांगले वागतात,*
*त्यांचे “आभार” माना.. आणि*
*जे आपल्याशी वाईट वागतात,*
*त्यांना “हसून” माफ करा..*
💝💝💝💝💝💝💝💝💝💝


कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:Related post ::

  1. Marathi attitude status for boys (2020)
  2. शुभ सकाळ ।। मराठी सुविचार ।। good morning marathi message
  3. लव्ह स्टेटस मराठी 2020 || marathi status on love

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥


स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:-

💖🌍🌛🌙🌕🌝🌕🌍💖

🌝 विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी अस8ते तोच खरा
कर्तृत्ववान होय. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 स्वत:ला घडविण्यात आपला


किमती वरून अस्तित्वात ठरते.
*शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात असतांना कुणी पाणी ढवळून वलय निर्माण केलं, तर गोंधळुन जाऊ नका, पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा, प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल*
*दैनंदिन कामात ही असे अडथ

 

🙏🏻🌹🙏🏻

*दौलत सिर्फ रहन सहन का*
*स्तर बदल सकती है*
*बुद्धि,नियत और तक़दीर नही।*

 

*प्रेम, सम्मान और अपमान..*
*ये एक निवेश की तरह हैं.*
*जितना हम दूसरो को देते है,*

 

आयुष्यात एक नातं अस असावं
दिसण्यावर नाही मनावर प्रेम करणारं..
जगाला दाखवण्यासाठी नाही,
आपल्या दोघातच जग निर्माण करणारं..

 

आयुष्यात एक नात असं असावं
एक उदास असताना दुस-यानं  सांगताच
ते

 

motivational status in marathi

 

 

जो मुस्कुरा रहा है
उसे दर्द ने पाला होगा
जो चल रहा है
उसके पाँव में छाला होगा

 


बिना संघर्ष के इन्सान
चमक नही सकता यारों
जो जलेगा
उसी दिये में तो उजाला होगा

 

*एकत्र या , एकत्र रहा , एकत्र काम करा*
*एकमेकांवर प्रेम करा,*
*एकमेअकःअःचा आदर करा*,
*एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
*मी बाजारामध्ये केळी घेण्यासाठी गेलो* .
*मी विचारले ” काय भाव आहे ?*
*त्यांनी सांगित

 

*🌹✍जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते…*
*पण*
*जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही असं अनुभव म्हणतो…!..*

 

दुसर्‍याने आपल्याला समजुन घ्यावे

असे प्रत्येकालाच वाटत असते

पण दुसर्‍याला समजुन घ्यायची

कोणाच्याच मनाची तयारी नसते……

 

जीवन जगतांना काळजी घेणारं
कुणीतरी सोबत असेल
तर..
चार क्षण आणखी जगावंस वाटतं…!
*घरात राहा – सुरक्षित राहा*

 

*प्रत्येक वस्तू ची किंमत*
*वेळ आल्यावरच समजते,*
*कारण*
*वातावरणात फुकट मिळणारा*
*ऑक्सिजन दवाखान्यात खुप*
*महाग विकला जातो*

 

*सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकतो. पण,क्षमा केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो;आणि,जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो;त्यामुळे,सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माफ व क्षमा करण्याचा पर्याय नक्कीच उत्तम असतो!*.

 

*नशिबाला दोष का द्यावा…? स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावेत…! कोणी माझं वाईट करतोय हे ” त्यांचं कर्म ! “मी कोणाचे वाईट करणार नाही, ” हा माझा धर्म !”*

 

*आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे.कालचा दिवस हा अनुभव होता,आजचा दिवस हा प्रयोग असतो,उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.*

 

*कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद फुलामध्ये असते.नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते…. !*
*आपल्या कडे काय आहे किंवा आपण कोण आहोत.यावर सुख कधीच अवलंबून नसत.आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असत*

 

motivational thoughts in marathi

 

 *कोणते कपडे घालू म्हणजे छान दिसू हा विचार तर आपण रोजच करतो.*
*परंतु कोणतं कर्म करू ज्यामुळे मी इतरांना आवडेन हा विचार कोणीच करत नाही.*

 

🙏 म्हणून अन्नावर कधी राग काढू नये 🙏

🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

🌸 घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

🌸 गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार ? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते. त्यासाठी असे प्रकार करू नका.

🌸 मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

🌸 अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

🌸 मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.🌺🌺🌹🌹

 

आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, अक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं? #

 

*नव्या पिढीला एक सणसणीत चपराक*

*(सर्वांनी अवश्य वाचावे, ही विनंती 🙏🙏)*

*माणुसकी ,स्वच्छता ,*निस्वार्थीपणा , कुटुंब व्यवस्था*
*पैशांचा दुरुपयोग, *व्यसनाधीन होणे,*
*विलासीपणा ,*
*ऐशारामी जीवन,*
*विनाकारण केले जाणारे प्रवास,*
*श्रीमंती,माजमस्ती ,*
*वडीलधाऱ्या सोबत* *उद्धटपणे बोलणे,*
*मग्रुरी , गुंडगिरी ,*
*फक्त जगण्यात अर्थ ,*
*मरणाची भीती ,*
*केलेल्या वाईट कृत्यांची आठवण ,*
*समारंभात केलेला पैशांचा अपव्यय*
*निकृष्ट जीवन शैली , अशा अनेक गोष्टी शिकवायला आलेला हा एक संदेश आहे.*

*पूर्वीच्या परंपरा विसरून आम्ही आधी तुळशीला घराबाहेर काढलं ! ” त्याला काय होतंय ? ” हा प्रश्न विचारणाऱ्या नवीन पिढीला हा चांगलाच झटका आहे .*

*सकाळी शुचिर्भूत होणे ही संकल्पना हळू हळू लयास चालली होती .*

*कधीतरी वाट्टेल तेव्हा अंथरुणातून उठून ” शॉवर ” खाली दोन मिनिटं उभे रहाणाऱ्या पिढीला , आता दोन दोन मिनिटाला हात धुवावे लागत आहेत .*

*घरात, कापूर , उदबत्ती , देवापुढे दिवा ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धेच्या सोईस्कर नावाने फाटा दिला गेला होता. आता त्याच कापरासाठी मॉल मध्ये लाईन लागलीय .*

*संध्याकाळची उदबत्ती लावून म्हटलेली रामरक्षा ही वरदान ठरतेय . घरी आल्यावर आधी पायावर पाणी घेणारी आपली संस्कृती सोडून बुटासकट बेडवर झोपून , बूट मोजे काढून भिरकवणारे आता चांगलेच पोळले आहेत.*

*धूप, दीप, नैवेद्य, आरतीमुळे प्रसन्न होणारं घरातलं वातावरण आता कमालीचं गढूळ झालं होतं. पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी तर ” घरचं जेवण ” लोक हळू हळू विसरत चालले होते. आता त्याची नितांत गरज भासतेय.*

*उठलं की सुटलं. प्रत्येक सुट्टीला गाडी घेऊन पर्यटन हेच जीवन असं थोडं वाटायला लागलं होतं, त्यावर पण थोडा आळा बसेल.*

*अंधश्रद्धेच्या नावाखाली आपणच आपल्या संस्कारांची दिलेली तिलांजली आता आपल्याच बोकांडी बसलीय . सणासुदीच्या रूपाने पूर्वजांनी केलेली रचना किती वेडगळ पणा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारी पिढी आता त्या मार्गाचा अवलंब नक्की करेल असं वाटायला लागलय .*

*शेवटी निसर्गापुढे सगळे सारखेच . रस्त्यावरच्या भिकाऱ्याला किंवा स्कॉर्पियोमधून फिरणाऱ्या श्रीमंताला ” मास्क ” बांधून फिरायची वेळ आलीय .*

*हे मानवा……. तू कितीही पुढारलास तरी शेवटी तुझ्या जगण्याची गुरू किल्ली फक्त त्या नियंत्याकडेच आहे . त्यामुळे त्याचं स्मरण कर .*

**

*पुराण ,ग्रंथ ,उपनिषदे यांच्यावरची धूळ झटका तरच हा झटका पचवण्याची ताकद तुमच्यात येईल. अन्यथा वडापाव, बर्गरच्या पिढीला असे कितीतरी कोरोना दर चार वर्षांनी झेलावे लागतील त्यासाठी…….*.

*हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,*
*आरोग्य दे , सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव*

*जगावरील संकट टाळून सर्वांना उदंड आयुष्य दे…*

*सर्वाचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम सर्वांचे मुखात अखंड राहू दे*
*ही प्रार्थना.*
🙏🙏

 

life motivational quotes in marathi

 

खरं सांगूका
इथे कोणी कोणाच नसतं
जो पर्यंत आपली वेळ चांगली
आहे तो पर्यंत तुम्ही सर्वांसाठी
मौल्यवान आहात. वेळ पडती
चालू जाल्यानन्तर कोणी तुमच्या
बाजूला ही फिरकणार नाही
भले तुमच्या जवळची किंवा
घरची असो. म्हणून कोणावरही
लक्ष न देता स्वता आनंदी राव्हा.
🌷🌷लक्षात ठेवा येते प्रत्येक जण स्वार्थी आहे 🌷🌷

 

*प्रसंग छोटा पण संदेश आयुष्याचा*

एक स्त्री तिच्या सहा वर्षाच्या मुलासोबत रेल्वेने प्रवास करत असतात. दरम्यान ते दोघेही पुस्तक वाचत असतात. त्या दोघांना पाहून इतर प्रवासी अचंबित होतात.
एक प्रवासी उत्सुकतेने त्या स्त्रीला विचारतो, “ताई, सध्याच्या काळात जे मूल काल जन्मले ते आज स्मार्ट फोन सोबत खेळताना दिसते. अन तुमचा हा मुलगा चक्क पुस्तक वाचतोय, कसं काय शक्य आहे हे? हा मुलगा स्मार्ट फोन किंवा टॅब वर गेम खेळत नाही. तो तुमचं ऐकतोच कसं ? अन तुम्ही हे कसं शक्य केलं?”
यावर त्या स्त्रीने स्मित हास्य करत शांतपणे उत्तर दिले, “दादा, *मुलं आपलं ऐकत नसतात हे खरं असलं तरी मुलं आपलं अनुकरण करतात हेही तितकेच सत्य आहे*.”

वाक्य छोटं आहे पण,
अर्थ खूप मोठा आहे. #🙏

 

*!.पहाटेची अमर्याद ताकद.!*

तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज मी पाच वाजता उठतो!

मोठी माणसं सांगायची,
“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”
आणि ते खरं आहे,

हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.

पण २००८ च्या महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.

पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल”
या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित होते,
काही दिवस त्याने कसेबसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,

आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?

इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्णावर हेल ने एक कोडवर्ड सांगितलाय.

*‘SAVERS’*

ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.

१) *Silence – (ध्यान)*

– शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!

– स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!

– मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!

– मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!

– माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!

– अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!

२) *Affirmations – (सकारात्मक स्वयंसुचना)*

– अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!

– स्वतः स्वतःला सुचना देणं,

– प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
– येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसुचना!

– स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.

– अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.

– आपले पुर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे

– या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.

– एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?

– वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!…

३) *Visualize – (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.)*

तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातुन कल्पना करणं, ती पुर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
– कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे.

– कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.

– दररोज आपण आपली ध्येयं पुर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे.

– पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो.

– ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे.

– मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.

– प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”

४) *Exercise – (व्यायाम)*

– शरीरातुन आळसाला पळवुन लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!

– शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!

– व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातुन उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणुस वासनांचा गुलाम बनतो.

– वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते.

– तो कशावरच एकाग्र होवु शकत नाही, आणि म्हणुन तो आनंदी होवु शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते.

– ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सुर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,

– शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.

५) *Reading – (वाचन)*

– पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.

– पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.

– वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.

६) *Scribing – (लिहिणे.)*

– माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो.

– लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते.

– लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.

– लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.

– म्हणुन संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.

– लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.

– लिहिल्याने विचार पक्के होतात.

– सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,

– एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,

– मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवुन कागदावर स्वप्ने रेखाटावीत.

– ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,

– आणि रोज स्वतःला कामे नेमुन द्यावीत, आणि पुर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं.

– लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!

– जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.

– अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.

ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलुन टाकणारी आहे.

वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावुन घेतल्या आहेत.

मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.
सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे…तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे…कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो…आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू….
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये…..
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची….स्वतःसाठी जगण्याची…..आलेल्या परिस्थीचा फायदा करून घेण्याची…..
उगीचच मनात भीती उत्पन्न करणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवू नका….

*काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.*

🙏🏻👏🏻👏🏻

 

3 Comments on “marathi motivational quotes 2020 | |मराठी प्रेरणादायी सुविचार सुविचार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *